२६ जानेवारी

सव्वीस जानेवारी आज 
लेवूनी गणतंत्री नवसाज
धन्य असे तव धन्य भारता, दिपले अगणित राजधिराज 
।।धृ।।

कुश तुझी मज नवरत्नांची , मुक्त वाहिनी जाणवते 
मूल्यहीन मौक्तिके ज्यापुढे, इथे जन्मती मानव ते 
शस्त्राहूनी शूर शब्द ईथे , करुणी  गेले महतीचे काज ।।१।।

इथे सयंमी शस्त्र, विवेकी अस्त्र असे तव मनुजाचे 
सदा स्फूर्ती सकला देती ते बोल तुकोबा-शिवबाचे 
तेच  रक्त अजूनिही समर्थ नसोनसी स्फुर्तीचे ताज ।।२।।

बुद्धाचा संदेश दिव्य तो भारतभू चे शस्त्र महान
उंच नभी घे गगन उडी वर फडकतसे राष्ट्राची शान 
प्रणाम घे तुज सकल मनूचे, मुक्त कंठी गर्जे आवाज ।।३।।

धन्य असे तव धन्य भारता.....

Comments