विद्रोह
असे वाटते.....
महाभयंकर वज्राघाती तांडव व्हावे
अख्खे ब्रम्हांड हादरून जावे
दिशा - दिशा कापून उठतील.....
असा मेघमल्हार करीत..... गगनभेदी
तप्त लाव्ह्यागत उसळावे.....
पेटत्या विद्रोहाने.....
जाळून टाकावे.....
अन्याय, असत्य व अमाणुसतेला
तोडून टाकाव्यात तटातटा.....
सनातनी शृंखला
अन मुक्त करावे माणसाला
फक्त माणसाला
Comments
Post a Comment