शब्द
शब्द !
भाषेच्या शेतातील पीक
काव्या-महाकव्यांना अर्थ देणारे
ग्रंथ-लेखाग्रलेखादिंना संदर्भ देणारे
चांगले अन वाईट !
समस्त गद्य-पद्यांना साकारणारे,
हसविणारे अन रडविणारे ही !
शब्द !
नव्हे - परमाणू .......
समस्त अवनी-अवकाशात भ्रमण करणारे,
भेदक ........
चंद्र-सूर्य ब्रह्मांडादिकांचेही
तेच...... शब्द.......
माणसांना जोडणारे .......
अन तोडणारेही
सृष्टी फुलविणारे अन पेटविणारे ही
किमयागार
तरीही दास......
"मानावा "! धन्य आहेस !
पण ........
हाय रे sss दुर्दयवा ......
"विनाशकाले ......" अन "कुऱ्हाडीचा दांडा ......."
असे तोडणारेच, विध्वंसक
शब्द ?
भाषेच्या शेतातील पीक
काव्या-महाकव्यांना अर्थ देणारे
ग्रंथ-लेखाग्रलेखादिंना संदर्भ देणारे
चांगले अन वाईट !
समस्त गद्य-पद्यांना साकारणारे,
हसविणारे अन रडविणारे ही !
शब्द !
नव्हे - परमाणू .......
समस्त अवनी-अवकाशात भ्रमण करणारे,
भेदक ........
चंद्र-सूर्य ब्रह्मांडादिकांचेही
तेच...... शब्द.......
माणसांना जोडणारे .......
अन तोडणारेही
सृष्टी फुलविणारे अन पेटविणारे ही
किमयागार
तरीही दास......
"मानावा "! धन्य आहेस !
पण ........
हाय रे sss दुर्दयवा ......
"विनाशकाले ......" अन "कुऱ्हाडीचा दांडा ......."
असे तोडणारेच, विध्वंसक
शब्द ?
Comments
Post a Comment