गहाण गाथा
तथाकथित सडक्या सनातनी गटारातील
समाधिस्त शुभ्र बगळे
भणभणत्या नरकातील वाळवळणारे किडे
गटागटा खाऊन.......
गावडुकरांना चिडवित,...... उरावरील अवाढव्य
रोगट ढेरीवरून दिमाखाने हात फिरवतांना
भासवतात......"जणू हेच समाजाचे ठेकेदार "!.....
जिथे - तिथे बनवितात प्रसिद्धीविश्वे........
ढेकणांप्रमाणे...... अन चिकटून बसतात
चामा-लिचोडाप्रमाणे घट्ट........
समाजाला सडवीत.......
परवित्त, जीवित्त, स्वांतत्र्य अन हक्कानवर......
राजरोस बलात्कार करीत.......
नीती, धर्म, साहित्य, शिक्षणाचे कित्ते गिरविणारे
हे व्यासपीठवीर......... केकाटू लागतात
तेव्हा कुत्र मुतलेल्या देवाच्या दगडांप्रमाणे
श्रोते धन्य-धन्य होतात..........
अन गात बसते भारतमाता, आपली "गहाण गाथा "
प्रसुतिवेदना विसरण्यासाठी!...........

Comments
Post a Comment