फुले पळसाची
फुले लगडली पळसांना की, पळसांनी शिरी मुकुट घातले
अहा केसरी लाल रंग ते, खग मध टिपण्यामध्ये दंग ते
मज वेडे अन करी धुंद ते,
कधी कळेना चाखाया मध झरझर मी तरू शिखर गाठले....फुले लगडली.....।।१।।
आता कळे मज खग भाषा ती, जल्लोषानंदे जी वदती,
अमृतकुंभे कि भरली ती
मधुशाला, मायनगरी जणू हे तरूच मजला स्वर्ग वाटले....फुले लगडली.....।।२।।
रस्त्यावरती आहो दुतर्फा, पुष्पगुच्छ कि लटकत शाखा,
कलकल गाती द्विज स्वागता
"असा इथे मी राजा", बघता नभोमहाली रवी लाजले....फुले लगडली.....।।३।।
पडे सडा जो तरु सभोती, मुले फुले ती वेचून नेती,
रंग खेळण्या अर्क काढती
जणू दुकाने रंगारी हे मुक्त करांनी वाटत सुटले....फुले लगडली.....।।४।।
बघा अता पळसाच्या शेंगा, गळती खाली घालीत पिंगा,
वाऱ्याशी जणू करती दंगा
वसंत आला, वसंत आला कोकिळ ही अन गाऊ लागले....फुले लगडली.....।।५।।

Comments
Post a Comment