आम्ही अता निघालो

बाबा तुझ्या कृपेने आम्ही सुजान झालो 
करि घेऊनि मशाली अता पुढे निघालो ।।धृ।।

अन्याय असत्याची अन दुःख वेदनांची 
जाळावयास होळी आम्ही अता निघालो ।।१।।

जे काल काफ़िरांनी आकाश चोरले ते 
आकाश हिरायाला आम्ही अता निघालो ।।२।।

वारा इथे कधीचा बंदिस्त ठेवलेला 
उठवित वादळांना आम्ही अता निघालो ।।३।।

साम्राज्य स्वापदांचे, निर्धास्त नग्ननृत्य
ठेचावायास  सारे आम्ही अता निघालो ।।४।।

"तु ज्ञानसूर्य!" गेला, उजळीत ह्या मशाली 
काळोख चिरायाला आम्ही अता निघालो ।।५।।

Comments

Popular posts from this blog

विद्रोह

२६ जानेवारी

माय